Take a fresh look at your lifestyle.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास पूर्ण, पोलीस म्हणाले..

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आज महिना झाला. गेल्या महिन्याभरापासून मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आत्महत्येप्रकरणी आवश्यक त्या सर्व व्यक्तींचे जबाबही नोंदवण्यात आले आहे. ३५ हून अधिकांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सर्वांच्या सहाय्याने सुशांतच्या आत्महत्येची चौकशी जवळजवळ पूर्ण झाली आहे. तसेच पोलिसांची टीम याचा रिपोर्ट ते पुढील १० ते १२ दिवसांमध्ये सादर करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी फॉरेन्सिक टीमच्या पाच अधिकाऱ्यांनी या केसवर चर्चा केली. या चर्चेत या केसचा अंतिम रिपोर्ट सादर करण्यावर सर्वांचं एकमत झालं. तसेच जर या प्रकरणी अजून कोणाची चौकशी करायची असल्यास त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात येईल. पण आतापर्यंत आलेल्या रिपोर्टच्या जोरावर डॉक्टरांना या केसमध्ये कोणतीही अनैसर्गिक गोष्ट जाणवली नाही.