Take a fresh look at your lifestyle.

दिल बेचारा चित्रपटातील ‘या’ गाण्यात दिसला सुशांतचा अनोखा अंदाज; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ए. आर. रेहमान यांच्या आवाजातील हे शीर्षकगीत प्रेक्षकांना खूप आवडले आहे. चित्रपटात मॅनीची भूमिका साकारत असलेल्या सुशांतचा धमाकेदार परफॉर्मन्स या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून ए. आर. रेहमान यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.

या गाण्यात कॉलेजमधल्या कार्यक्रमादरम्यान सुशांत परफॉर्म करताना दिसतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत संजना सांघी मुख्य भूमिका साकारत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही युट्यूबवर भरभरून प्रतिसाद मिळाला. येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

मुकेश छाबडाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.सुशांतचा  मृतदेह १४ जून रोजी मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी आढळून आला होता. मे महिन्यात त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकण्यात आलं होतं. मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.