Take a fresh look at your lifestyle.

अशी झाली होती शाहीदची १२ वर्षांनी लहान असणार्‍या मिरा राजपूतशी भेट; गुपचूप केले होते लग्न

मुंबई | शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात चमकदार जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंगही आहे. शाहिद ने आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि तिचे लग्न झाले तेव्हा ती 21 वर्षांची होती. चला आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेमकथेबद्दल काही खास गोष्टी सांगतो

शाहिद आणि त्याचे वडील पंकज कपूर अनेकदा दिल्लीत होणार्‍या त्यांच्या गुरूंच्या सत्संगात जात असत. मीराचे कुटुंबियही या सत्संगात येत होते आणि दोघांचीही येथे भेट झाली. दोघांच्या मैत्रीनंतर पंकज कपूरने या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव मीराच्या वडिलांच्या समोर ठेवला. मीरा राजपूत शाहीदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, यामुळे तिने पहिल्यांदा लग्न करण्यास नकार दिला. शेवटी बहिणीच्या मनावरुन मीराने लग्नालाही होकार दिला.

14 जानेवारी 2015 रोजी या दोघांमध्ये एक छुपे लग्न झाले. दोघांनी छतरपूरमधील फॉर्म हाऊसमध्ये तडकाफडकी लग्न केले. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तीच नाव त्यांनी मीशा ठेवले, त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये मुलगा जेन च्या रुपाने पुत्ररत्न झाले.