Take a fresh look at your lifestyle.

तू आत्महत्या का करत नाहीस? या प्रश्नावर भडकली अभिनेत्री 

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। टीव्ही अभिनेत्री बेनाफ्सा सूनावाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर टाकत असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिने एक लाईव्ह केले होते. या लाईव्ह चॅट मध्ये एका युजर ने थेट तू आत्महत्या का करत नाहीस? असा प्रश्न केला आहे. यावर ती चांगलीच भडकली असून तिने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या युजरने बेनाफ्साला तू आत्महत्या का करत नाहीस? असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न पाहून अभिनेत्री संतापली. “जगभरातील लोक सध्या करोनामुळे त्रस्त आहेत. लोक मानसिक आजारांशी लढत आहेत. गरीब व्यक्ती बेरोजगार झाला आहे. आणि तू काय विचारतोय? असे प्रश्न विचारण्यापूर्वी जरा एकदा विचार कर.” अशा आशयाची पोस्ट लिहून बेनाफ्साने त्याला प्रत्युत्तर दिले. तसेच आपल्या पोस्टमध्ये तिने सायबर पोलिसांना देखील टॅग केले आहे.

बेनाफ्साची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.बेनाफ्सा सूनावाला एक टीव्ही अभिनेत्री आहे. द रॉयल पॅलेट, बॉक्स क्रिकेट लीग, एम टीव्ही ट्रोल पोलीस यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती झळकली आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस या शो दिली. बेनाफ्सा सोशल मीडियावर आपल्या मादक फोटोंमुळे चर्चेत असते.